Saturday, 15 December 2018

बोपय्यांच्या निवडीवरुन काॅंग्रेसचं टीकास्त्र

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भाजपने आणखी एक खेळी करत कर्नाटक सत्ता संघर्ष आता शिगेला पोहोचवला आहे. कर्नाटक विधानसभेच्या सभापतीपदी आपले विराजपेठ येथील आमदार के.जी. बोपय्या यांना बसवलं आहे. यावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला असून हा राज्यघटनेचा अवमान आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्नाटकमधल्या राजकीय घडामोडींनी वेगवेगळे वळण घेतले आहेत. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे आमदार के.जी. बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. सभागृहातल्या सर्वात ज्येष्ठ सदस्यांची नियुक्ती या पदावर केली जाते असं संकेतानुसार सांगण्यात येत आहे.

71 वर्षांचे काँग्रेसचे आमदार आर.व्ही.देशपांडे हे सभागृहातले सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना डावलून बोपय्यांची नियुक्ती केल्यानं राज्यपालांच्या निर्णयावर काँग्रेस आणि जेडीएसने टीका केली आहे.

या निर्णयाविरोधात काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली.

बोपय्या यांनी अनेक वेळा राज्यघटनेचा केलाय अवमान - सुरजेवाला  

येडियुरप्पांच्या विरोधात जाऊन त्यांनी बंडखोरी केली होती - सुरजेवाला 

तसंच आम्ही यावर आक्षेप घेतोय - सुरजेवाला

याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार – सुरजेवाला

हंगामी अध्यक्ष म्हणजे काय?

  • हंगामी म्हणजे 'काही काळापुरता'...
  • हंगामी अध्यक्षांची निवड राज्यपाल करतात.
  • जेव्हा विधानसभा आपला अध्यक्ष नियुक्त करू शकत नाही अशा वेळी राज्यपाल हंगामी अध्यक्ष नेमू शकतात.
  • हा अध्यक्ष नवनिर्वाचितांना शपथ देतो आणि संपूर्ण कार्यक्रम यांच्या देखरेखीतच पार पडतो.

येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत

कर्नाटक राज्यपालांवर राज ठाकरेंनी डागली तोफ

loading...

Top 10 News

राशी भविष्य