Sunday, 27 May 2018

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
  • कर्नाटकातल्या त्रिशंकू अवस्थेनंतर सत्ता स्थापनेची गणितं बदलली...
  • सोनीया गांधीच्या फोननंतर आघाडीच्या प्रयत्नांन यश
  • कुमारस्वामींना मुख्यमंत्री पदाच्या ऑफरसह जनता दलाला काँग्रेसचं समर्थन
  • प्रस्ताव जनता दलाने स्विकारल्याची गुलामनबी आझाद यांची माहिती
  • सत्ता स्थापनेसाठी भाजपाच्या गोटातही हालचालींना सुरुवात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या घरी दाखल
  • येड्डीयूरप्पांनी मागीतली राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ,भाजपाही करमार सत्ता स्थापनेचा दावा
  • राजकारणात हार जीत सुरु असते असं म्हणत अशोक चव्हाणांनी स्विकारला पराभव
  • पुढील काळात चांगल काम करण्याचा व्यक्त केला विश्वास
  • मुंबईसह ठाणे,नाशिकमध्ये भाजपा कार्यालयात जल्लोष...फटाके, ढोल वाजवत मिठाई वाटून केला विजयोत्सव
  • पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विजय अतुलनीय...
  • आता देशात कॉग्रेस शोधण्याचं अभियान सुरु करण्याची आवश्यकता...
  • केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांचे कौतुकोद्गार...
  • सीमा भागातील जनतेला नव्या सरकारने न्याय द्या उद्धव ठाकरेंची निकालांवर प्रतिक्रिया
  • ईव्हीएम बाबतचा संशयाचं भूत दूर करण्याचाही दिला सल्ला...
  • पालघर पोट निवडणूकीत बाजी मारण्याचा व्यक्त केला निर्धार.....
  • कर्नाटकच्या विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढला...2019 ला पुन्हा सत्तेत येणार...भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला विश्वास...
  • “अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही…मोदींवर टीका करून फक्त तुमचा खप वाढेल, आम्ही सामना तयार करायला तयार आहोत”…भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारांनी शिवसेनेला डिवचलं...
  • कर्नाटकातील भाजपाचा विजय म्हणजे ईव्हीएम मशिनचा घोळ , कर्नाटक निवडणूक निकालावर राज ठाकरे यांची बोचरी प्रतिक्रिया.......
  • राहुल गांधी कॉग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून कॉग्रेसचा थेट तीसरा पराभव आहे. राहुल गांधी यांनी स्वत:ला पंतप्रधानाचे दावेदार घोषित केले होते. विरोधी पक्षांना एकत्र यायचे असेल तर, एकत्र यावे सर्व घाण एकत्र बाहेर काढू- केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड 
  • कर्नाटकच्या गरीब लोकांचे नेतृत्व एडीयुरूप्पा करतील - आशिष शेलार 
  • कॉंग्रेसने पुन्हा फोडलं ईव्हीएम मशीन्सवर खापर...भाजपकडून बॅलेटऐवजी ईव्हीएम मशीन्सचाच आग्रह का? कॉग्रेसचे जेष्ठ नेते मोहन प्रकाश यांचा सवाल
  • भाजपसाठी कर्नाटकचा विजय ऐतिहासीक म्हणत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी केलं कर्नाटकच्या जनतेचं अभिनंदन
  • कर्नाटकातील भाजपाचा विजय म्हणजे ईव्हीएम मशिनचा घोळ , कर्नाटक निवडणूक निकालावर राज ठाकरे यांची पहिला प्रतिक्रिया
  • कर्नाटकात भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने... कर्नाटकात विजयी झाल्यास 21 राज्यांवर NDAचा झेंडा.... बेंगळुरूमध्ये भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष.
  • कर्नाटकातली काँग्रेसची सत्ता गेली, शिकारीपुरामधून भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येड्डीयुरप्पा विजयी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरीमध्ये पराभव, तर बदामीमधून अल्प मतांनी आघाडी…
  • कर्नाटक मधील यशानंतर मुंबईतील भाजप कार्यालयात जल्लोष करण्यासाठी भाजप चे कार्यकर्ते आता जमत आहेत...थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार या जल्लोषात सहभागी होणार 
  • कर्नाटक विधानसभा निवडणूक कलांचा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स 310 अंकांनी उसळला
  • शिकारीपुरामधून भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडियुरप्पा विजय, हालीवूर मतदारसंघातून काॅंग्रेसचे उमेदवार आर. व्ही देशपांडेचा विजय 
  • काॅंग्रेसला धक्का ...मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा चामुंडेश्वरीमध्ये पराभव, तर बदामीमधून अल्प मतांनी आघाडी
  • कर्नाटकातली काॅंग्रेसची सत्ता गेल्यात जमा, काॅंग्रेसचं संख्याबळ निम्म्याने घटण्याची चिन्हं, जनतादल सेक्युलरची किंगमेकरची भूमिका कागदावरच राहण्याची शक्यता
  • कर्नाटकात भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने....कर्नाटकात विजयी झाल्यास २१ राज्यांवर NDA चा झेंडा... बेंगळुरुमध्ये भाजपा कार्यालयात जल्लोष...
  • काँग्रेस आणि त्रिशंकूला मागे टाकत भाजपची एकहाती सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरु
  • भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी एस येडियुरप्पा शिकारीपुरा मतदारसंघात 9000 मतांनी आघाडीवर
  • भाजपच्या आघाडीनंतर शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स 246 अंकांनी वधारला
  • चामुंडेश्वरी मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या 11 हजार मतांनी पिछाडीवर
  • कर्नाटक निवडणुकीत काटे की टक्कर... काँग्रेस 91, भाजप 103 तर जेडीएस 27 जागांवर आघाडीवर...
  • काँग्रेसने गुलाम नबी आझाद आणि अशोक गहलोत वरिष्ठ नेत्यांना कर्नाटकात पाठवले... विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर निर्णय...
  •  बेळगावात चारही जागांवर एकीकरण समिती पिछाडीवर... कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामी मतदारसंघातून आघाडीवर...
  • कर्नाटकात जेडीएसला मोठा धक्का... काँग्रेस आणि भाजपाच्या जागांमध्ये वाढ... तर जेडीएसला उतरती कळा... 
  • कर्नाटकचा कल भाजपच्या बाजूने... काँग्रेस आणि भाजपात अटीतटीची लढत... त्रिशंकू विधानसभेची शक्यता जास्त...
  • आज समजणार कर्नाटकचा कौल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आर. आर. नगर मतदारसंघातील मतपत्रिकांचे घोटाळे आणि जयनगरमध्ये भाजप उमेदवाराच्या निधनामुळे या दोन जागांसाठी मतदान झाले नाही.

loading...

Top 10 News

Popular News