Tuesday, 11 December 2018

विज्ञानाची कास सोडून अंद्धश्रद्धेचा ध्यास, प्रकृती सुधारण्यासाठी जादुटोण्याचा आधार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

विद्येचं माहेरघर, माहिती आणि तंत्राज्ञानाचे हब अशी बिरुदं मिरवणाऱ्या पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सच्या उपस्थितीतीच एका आजारी महिलेवर जादूटोणा करण्यात आलाय. आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. 24 वर्षीय संध्या सोनवणे आजाराने त्रस्त होत्या. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना डॉ. सतीश चव्हाण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात करण्यात आले होते. परंतु तिथेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे या महिलेच्या कुटुंबीयांनी एका मांत्रिकाला थेट रुग्णालयात बोलावून जादूटोणा केला. या मांत्रिकाने डॉक्टर आणि नर्सच्या समोरच मंत्र पुटपुटत महिलेच्या अंगावरून उतारा काढला. दरम्यान, आजार अधिकच बळावल्याने या महिलेचं निधन झाले. जादूटोण्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य