Tuesday, 11 December 2018

'12 कोटी मराठी भाषिकांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा आज अपमान झाला' - अजित पवार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. राज्यपाल सी विद्यासागर यांनी आपल्या अभिभाषणात विविध योजनांची माहिती दिली. मात्र, राज्यपालांच्या अभिभाषणाची सुरुवात इंग्रजीत झाल्याने विरोधी पक्षनेत्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी राज्यपालांचे भाषण इंग्रजीत होते. त्याचा अनुवादही मराठीतून झाला नव्हता. 

त्यामुळे आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभात्याग करत भवनाच्या बाहेरही घोषणाबाजी केली. विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारवर ही नामुष्की ओढवली.सरकारकडून मराठीची गळचेपी सुरू असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘मराठीच्या अनुवादाऐवजी अभिभाषणाचे गुजराती अनुवाद सुरुवातीला ऐकवला जात होता’ असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागितली.
राज्यपालांच्या अभिभाषणाचं मराठी भाषांतर न होणे ही गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी विधान सभा अध्यक्षांना संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
अजित पवारांच्या विधान भवना बाहेरील घोषणा
- अनेक वर्षांची परंपरा आहे यात राज्यपालांचे अभिभाषण होत असत.
- आज 12 कोटी मराठी भाषा बोलणार्या महाराष्ट्रातील जनतेचा आज अपमान झाला आहे.
- राज्यपालांमा मराठी येत नाही हे ठीक आहे.पण, बाकी सगळ्या आमदारासाठी मराठी अनुवाद केले जात होत.
- पाहिले पाच मिनिटे अनुवाद होत नव्हतं.
- 15 मिनिटं झाली तर राज्यपालांचे मराठीत भाषांतर केले जात नव्हते.
- मराठी भाषा दिन आहे यावेळी मराठी जतन झाली पाहिजे मात्र आज त्याचा अपमान केला गेला. 
- शिवसेना प्रत्येयक वेळी मराठीचा मुद्दा मानत होते मात्र ते गप्प होते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य