Friday, 23 February 2018

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याने मुंबईत खळबळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मंत्रालयात एक थराराक घटना घडली आहे. मंत्रालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका तरूणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास या तरूणाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. हर्षल सुरेश रावते असं या तरूणाचं नाव असून तो मुंबईच्या चेंबूरचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

तरूणाच्या प्रकृतीबाबत अजून संभ्रम असून त्याला मुंबईच्या सेंट जॉर्ज रूग्णालयात नेण्यात आलं असता त्याला डॉक्टराने मृत घोषित केले आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अजून नेमकी माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर बुधवारी एका तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले होते त्यानंतर ही तिसरी घटना घडली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

mantralay-suicide-harshal.jpg

suicide.png

Top 10 News

Popular News