Tuesday, 13 November 2018

सात महिन्याच्या बाळाला दुध पाजत असणा-या आई सहीत गाडी टो केली; ट्रॅफिक पोलिसाचा पराक्रम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तान्ह्या बाळाला दुध पाजत असणा-या आई सहीत गाडीला टो करण्याचा प्रकार मालाडच्या एस.व्ही रोडवर घडलाय.

आपल्या सात महिन्याच्या मुलीसहित ही महिला गाडीच बसली होती. मुलीची औषधं आणण्यासाठी तिचे वडील मेडीकल स्टोअरमध्ये गेले असता ही गाडी टोईंग करण्यात आली.

मात्र, गाडीत कुणी आहे की नाही याची काहीही दखल न घेता गाडी ट्राफिक पोलीसांनी टो केलीय. ती महिला ओरडून पोलीसांना सांगत असतानाही पोलीसांनी तिचं म्हणणं ऐकून न घेता गाडी टो केलीय. या प्रकरणाची दखल मुंबई ट्राफिकच्या वरिष्ठ पोलीस अधिक-यांनी घेतली.  या प्रकरणी संबधीत पोलिस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य