जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली
हिंगोलीत एक धक्कादायक घटाना घडलीय. बायकोसोबत सुड उगवण्यासाठी नवऱ्याने खालची पातळी गाठत घाणेरडे काम केलंय.
नव-यापासून विभक्त असलेल्या आणि माहेरी राहणा-या पत्नीच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन पत्नीच्या नावे अश्लिल चित्र आणि घाणेरडे मॅसेज टाकून पत्नीची बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय.
एवढ्यावरच न थांबता पती गणेशने पत्नीच्या आईच्या मोबाईलवर देखील अश्लिल मॅसेज करण्यास सुरुवात केली. या प्रकाराला त्रस्त होऊन शेवटी पत्नीने कुरुंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.
याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील कुरूंदा पोलीस ठाण्यात सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.