Tuesday, 13 November 2018

नारायण राणेंना मंत्रीमंडळात घेतले तर... शिवसेनेचा पुढचा प्लान तयार?

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत शिवसेना आडवी आली आहे. नारायण राणेंना मंत्रीमंडळात घेतले तर काय करायचे याचा प्लान शिवसेनेने तयार केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.    

राणेंना मंत्रिमंडळात घेतल्यास आम्हाला गृहीत धरू नका असा इशारा मातोश्रीवरुन देण्यात आला आहे. राणे यांना मंत्रीमंडळात घेतल्यास शिवसेनेचे मंत्री राजीनामा देण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाच्या मुद्द्यावरुन मंत्रिमंडळ विस्तराचं घोड अडलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे नारायण राणेंच्या मंत्रीमंडळ प्रवेशाबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.  

शिवसेनेने भाजप सरकारचा पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादीच समर्थन मिळू शकत अशी देखील चर्चा आहे.

भाजप नेते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची वाढती जवळीक यामुळे पुन्हा एकदा वेगळ्या राजकीय समिकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य