Wednesday, 15 August 2018

मुंबई महापालिकेत भाजपला मोठा धक्का; मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक जाणार शिवसेनासोबत?

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भांडुप पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मुंबई महानगरपालिकेत राजकीय भूकंप अनुभवायला मिळाला आहे. भांडुपमधील विजयानंतर भाजपचे पालिकेतील संख्याबळ वाढले होते. संख्याबळ वाढल्याने महापालिकेत भाजपची सत्ता व महापौर येईल, असा दावा भाजप नेत्यांनी केला होता.

त्यानंतर धास्तावलेल्या शिवसेनेने वेगाने पावले उचवत भाजपच्या या खेळीला शह दिला.  शिवसेनेने थेट मनसेच्या सहा नगरसेवकांना गळाला लावलं.

त्यामुळे मुंबईत अवघे सात नगरसेवक निवडून आलेल्या मनसेला मोठा धक्का बसलाय. त्यामुळे भाजपने ऐनवेळी दगाफटका केला तरी शिवसेनेने आपली बाजू भक्कम केलीय.

शिवसेनेसोबत गेलेले 'मनसे' नगरसेवक...

प्रभाग क्र. 126 अर्चना भालेराव

प्रभाग क्र. 133 परमेश्वर कदम

प्रभाग क्र. 156 अश्विनी मतेकर

प्रभाग क्र. 163 दिलीप लांडे

प्रभाग क्र. 189 हर्षल मोरे

प्रभाग क्र. 197 दत्ताराम नरवणकर

मनसेशी एकनिष्ठ

प्रभाग क्र. 166 संजय तुर्डे

loading...

Top 10 News