Wednesday, 15 August 2018

मुंबई महापालिकेत भांडूपची पाटीलकी भाजपकडे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई महापालिकेत भांडूपची पाटीलकी भाजपकडे आली आहे. भांडूप पश्चिम प्रभाग क्रमांक 116मध्ये  जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवलाय. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला.

काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

जागृती पाटील या प्रमिला पाटील यांच्या सून आहेत. पहिल्या फेरीपासूनच जागृती पाटील यांनी मोठी आघाडी घेतली होती. हिच आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि मोठ्या फरकानं विजय मिळवला.

loading...

Top 10 News