Friday, 18 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 050918

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन दहीहंडीमधल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राम कदमांनी व्यक्त केला खेद...पण विरोधकांनी अर्धवट व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप.

#हेडलाइन जरा जपून बोला, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही राम कदमांना फटकारलं.

#हेडलाइन आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर काँग्रेस आणि रघुराम राजनवर फोडणं म्हणजे पांचटपणा, सामनामधून पुन्हा एकदा मोदींवर हल्ला.

#हेडलाइन काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज जेजुरीमध्ये, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला.

#हेडलाइन रायगडमधील सुवर्णपदक विजेत्या वैभवीच्या आत्महत्येला शिक्षक जबाबदार असल्याचा आरोप, शिक्षकाच्या चौकशीच्या मागणीसाठी पोलिसांत तक्रार.

#हेडलाइन जालन्यात एका मुख्याध्यापकाचा आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द, मुख्यमंत्री आणि ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द वापरल्यानं कारवाई.

#हेडलाइन लोकलमध्ये जागेसाठी उलटा प्रवास करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन, अंबरनाथ स्टेशनवर कडक पोलीस बंदोबस्त.

#हेडलाइन ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरात पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी गेलं वाया, रात्री उशिरापर्यंत पाईपलाईन दुरूस्तीचं काम.

#हेडलाइन पर्यावरणाचे धडे विद्यार्थ्यांमध्ये रुजवणारे बुलडाण्याचे आदर्श शिक्षक नंदकिशोर बोकाडे, बोकाडे यांच्या प्रेरणातून आतापर्यंत घडले हजारो विद्यार्थी. 

loading...