Thursday, 17 January 2019

#हेडलाइन्स @9.00am 250618

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @9.00 AM

#हेडलाइन सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार बॅटींग सुरुच, सखल भागात साचले पाणी, मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 15 मिनिटांनी उशिरानं

#हेडलाइन मुंबईच्या किंग्ज सर्कलच्या गांधी मार्केटजवळ पाणी साचल्यानं टेम्पो आणि बेस्ट बस अडकली, प्रवाशांना बाहेर काढण्यात यश, पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी

#हेडलाइन मुसळधार पावसामुळे अंबरनाथमध्ये मलनिस:रणाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर ठाण्यात भिंत कोसळल्यानं 2 कार आणि एका बाईकचं नुकसान

#हेडलाइन नवी मुंबईतल्या खारघरमध्ये 3 मुलं तलावात बुडाली, एकाचा मृतदेह सापडला, दोघांचा शोध सुरू तर बदलापुरात एकाचा धरणात बुडून मृत्यू

#हेडलाइन लातूरमध्ये स्टेप बाय स्टेप क्सालचे संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या, मारेकरी फरार

#हेडलाइन बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या, उद्धव ठाकरेंचं राज्य सरकारला आवाहन, संपात सहभागी झाल्यानं एक हजार कर्मचाऱ्यांना केलं होतं बडतर्फ

#हेडलाइन कोकण पदवीधर मतदार संघाच्या मतदानाला सुरुवात, २८ जूनला होणार मतमोजणी, भाजप, राष्ट्रवादीसह १४ अपक्ष उमेदवार रिंगणात

#हेडलाइन तेलंगणामध्ये ट्रॅक्टर कालव्यात कोसळल्यानं 14 महिलांचा मृत्यू, ट्रॅक्टरचालक फरार

#हेडलाइन आज तिथीप्रमाणे 345व्या शिवराज्याभिषेक दिन, किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन, ढोलताशांच्या गजरामुळे वातावरण शिवमय

#हेडलाइन पावसामुळे आभाळाला गवसनी घालणाऱ्या डोंगराला फुटले पाझर, पांढऱ्या शुभ्र वाहणाऱ्या धबधब्यांनी पर्यटकांचे वेधले लक्ष, कोकणात कोसळधार सुरुच

loading...