Sunday, 18 November 2018

#हेडलाइन्स @10.00am 160618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @10.00 AM

  • #हेडलाइन पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी परशुराम वाघमारेच्या अटकेतून पानसरे आणि कलबुर्गींच्या हत्यांचा छडा लागण्याची शक्यता, तिन्ही हत्यांसाठी एकच पिस्तुल वापरलं गेल्याचा अंदाज
  • #हेडलाइन संपत्तीसाठी पोटच्या मुलानं आईवडिलांना नारळ पाण्यातून दिलं विष, लातूरमधील धक्कादायक घटना, वडिलांचा मृत्यू, आईवर उपचार सुरू तर आरोपी मुलगा गजाआड
  • #हेडलाइन जम्मू काश्मीरधील ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्याप्रकरणी संशयिताला अटक, सुरक्षा रक्षकाचं चोरलेलं पिस्तुलही हस्तगत
  • #हेडलाइन रायगडच्या खरसई गावात भरधाव वेगात असलेला ट्रेलर शिरला चक्क घरात, अपघातात 2 जण जखमी तर राहतं घर जमीनदोस्त
  • #हेडलाइन मुंबईकरांनो रविवारी रेल्वे वेळापत्रक पाहूनच करा प्रवास, पश्चिम आणि मध्य रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 4 तर हार्बरवर मध्यरात्री मेगाब्लॉक
  • #हेडलाइन एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री, मध्यरात्रीपासून 18 टक्के भाडेवाढ लागू, इंधनदरवाढ आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामुळे तिकीट दरात वाढ
  • #हेडलाइन देशभरात रमजान ईदचा उत्साह, चंद्रदर्शनानंतर मुस्लिम बांधवांची मशिदीत गर्दी, शिरकुर्मा खाऊन ईद साजरी
  • #हेडलाइन अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर अजिंक्य रहाणेनं दाखवली खिलाडूवृत्ती, अफगाणिस्तानच्या टीमला सोबत घेऊन ट्रॉफीसोबत काढला फोटो
  • #हेडलाइन रोनाल्डोच्या हॅट्रिकमुळे पोर्तुगाल स्पेनमधील मॅच ड्रॉ, 3 - 3 गोलच्या बरोबरीनं मॅच राहीली अनिर्णित
loading...