Sunday, 18 November 2018

#हेडलाइन्स @8.00am 140618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM

  • #हेडलाइन कल्याण - डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत एसीबीच्या जाळ्यात, गेल्या १६ तासांपासून सरू असलेली चौकशी पूर्ण, कोट्यवधींचं घबाड समोर येण्याची शक्यता
  • #हेडलाइन महाराष्ट्र सदनप्रकरणी क्लीन चीट देणाऱ्या प्रवीण दीक्षितांनी बढतीसाठी माझ्यावर खोट्या केसेस टाकल्या तर, दिवाणी खटल्याऐवजी फौजदारी खटला दाखल करून मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला 'जय महाराष्ट्र'च्या खास मुलाखतीत छगन भुजबळ यांचे आरोप
  • #हेडलाइन भिडे गुरुजींविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आंबे खाऊन मुलं होत असल्याच्या वक्तव्याविरोधात जादुटोणा विरोधी कायद्या अंतर्गत तक्रार दाखल
  • #हेडलाइन राहुल फटांगळे हत्येप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी फोटोंच्या आधारे एकाला अटक तर, कोरेगाव - भीमा प्रकरणी तपासयंत्रणा दिशा बदलत असल्याचा तसंच आरक्षणवादी आणि विरोधी गट तयार करण्याचा कट आखला जात असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप
  • #हेडलाइन जुलै, ऑगस्टमध्ये पुन्हा बँक कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याची शक्यता पगारवाढीबाबत अपेक्षित निर्णय न झाल्याने बँक कर्मचारी संघटनांचा इशारा
  • #हेडलाइन सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धमकी दिल्यास 5 वर्षं जाल तुरुंगात, कारावासाच्या शिक्षेत 2 वर्षांची वाढ
  • #हेडलाइन इंधनदरवाढ आणि एसटी कर्मचारी वेतनकराराचा एसटी प्रवाशांना फटका, एसटीच्या तिकीटदरात वाढ, आज मध्यरात्रापासून भाडेवाढ लागू
  • #हेडलाइन पंतप्रधान आवास योजनेत आता अधिक मोठ्या घरांना अनुदानपात्र, घरांच्या आकारात 33 टक्के वाढ
  • #हेडलाइन मुलुंडमध्ये 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं शानदार उद्घाटन, कलावंतांना जपण्याचा शरद पवारांचा तर नाटक मोठं करण्याचा राज ठाकरेंचा सल्ला
  • #हेडलाइन आजपासून रशियामध्ये रंगणार फिफा वर्ल्ड कपचा महासंग्राम, रशिया आणि सौदी अरेबिया संघांमध्ये सलामीची लढत, तर जगभरात वर्ल्ड कपचा फिव्हर
loading...