Thursday, 17 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 310518

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन पालघर आणि भंडारा - गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी, जय महाराष्ट्रवर दिवसभर पाहा निकालाचे अपडेट आणि विश्लेषण

#हेडलाइन एमपीएससीच्या परीक्षेत जळगावचा रोहितकुमार राजपूत अव्वल तर सोलापूरचे अजयकुमार नष्टे मागासवर्गीयांमध्ये राज्यात पहिले

#हेडलाइन महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीचा ऑनलाईन निकाल जाहीर यंदाही 94.85 टक्के मिळवत कोकण विभागानं मारली बाजी, नाशिकचा निकाल मात्र सर्वात कमी

#हेडलाइन अंतिम टप्प्यात काम आलेल्या ठाकुर्लीतील पुलावरून लोकार्पणापूर्वीच वाहतूक सुरू, सेना - भाजपाच्या श्रेयवादाची तर ही लढाई नाही ना ?, नागरिकांकडून केला जातोय सवाल

#हेडलाइन 7 वर्षांच्या पोटच्या मुलाला ठार मारून पित्यानं केली आत्महत्या, घरगुती भांडणातून ठाण्यात घडली घटना

#हेडलाइन ठाणे स्थानकात लोकलमध्ये चढताना आरपीएफ जवानानं वाचवले महिलेचे प्राण, अचानक लोकल सुरु झाल्यानं तोल जाऊन खाली पडणाऱ्या महिलेला वाचवण्यात यश

#हेडलाइन गोव्यात कळगुट समुद्रकिनारी अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पुण्यातील 2 अल्पवयीन मुलांसह 9 पर्यटकांना अटक

#हेडलाइन पिंपरीत फिल्मी स्टाईलनं बियरच्या दुकानाची तोडफोड करून टोळी पसार, पोलिसांनी मात्र दुकानातील 2 कामगारांना संशयित म्हणून घेतलं ताब्यात

#हेडलाइन संभाजी भिडे यांचं वक्तव्य म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अपमान, त्यांच्याविरुद्ध सरकार कारवाई करणार का ? विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

#हेडलाइन समृद्धी महामार्गासाठी सक्तीच्या भूसंपादनास नाशिकमधील शेतकऱ्यांचा विरोध, जीव देऊ पण एक इंचही जमीन देणार नाही, शिवडे गावातील शेतकऱ्यांची भूमिका

 

Jai Maharashtra News - Live stream HD - Marathi News | जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE - https://www.youtube.com/watch?v=Ii5KkXsfYZc


(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)

loading...