Friday, 18 January 2019

#हेडलाइन्स @7.00am 280518

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 AM

#हेडलाइन गडकरींना वाढदिवासाचं रिटर्न गिफ्ट, दिल्लीला मेरठशी जोडणाऱ्या दिल्ली - मेरठ एक्स्प्रेस वेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न.

#हेडलाइन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल, पालघरसंबंधीची १४ मिनिटांची संपूर्ण ऑडिओ क्लिप निवडणूक आयोगाला सादर, क्लिपमध्ये फेरफार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आयोगाकडे मागणी, तसंच उद्धवशिवाय इतर नेत्यांना मोजत नसल्याचं सूचक वक्तव्य.

#हेडलाइन पालघर, भंडारा, गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीसाठी सोमवारी मतदान, पालघर मध्ये पंचरंगी तर भंडारा गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत, पालघरमध्ये सेना भाजपमध्ये काट्याची टक्कर.

#हेडलाइन पेट्रोल - डिझेलच्या भावात सलग चौदाव्या दिवशी वाढ मुंबईत पेट्रोल पोहोचलं 86 रुपयांवर, तर डिझेलनं पार केली बाहत्तरी.

#हेडलाइन संभाजी भिंडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा, कोण न्यायाधीश आणि हा सर्व नालायकपणा कशासाठी असा सवाल करत वादाला फोडलं तोंड.

#हेडलाइन बोटीवरील तरंगत्या हॉटेलांना परवानगी देताना मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात, सी-लिंकच्या आपातकालीन सुरक्षेसाठी बांधलेली जेट्टीच दिली बोटमालकांना आंदण, जय महाराष्ट्रच्या बातमी आणि बरंच काही, या कार्यक्रमात मच्छिमार नेते दामोदर तांडेलांचा धक्कादायक आरोप.

#हेडलाइन राज आणि उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्र यावे म्हणून दादरमध्ये एका शिवसैनिकाचा आत्महत्येचा स्टंट, खांबावर चढून दिली आत्महत्येची धमकी तासाभराच्या नाट्यानंतर अग्निशमन दलाने केली सुटका.

#हेडलाइन सिंधुदुर्गातल्या पहिल्या मल्टिस्पेशालिटी लाइफलाइन हॉस्पिटलचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या हस्ते उद्धाटन, सिंधुदुर्गासह आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांमधल्या रुग्णांना मिळणार उच्च दर्जाची रुग्णसेवा, नारायण राणेंचं स्वप्न साकार.

#हेडलाइन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात विरोधकांनाही मिळणार सारखीच ट्रीटमेंट, लाइफलाइन हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी पवारांची टोलेबाजी, तर मुख्यमंत्र्यांनीही सर्व सरकारी योजनांच्या अंमलबजावणीची दिली खात्री, राणेंच्या स्वप्नपूर्तीचं सर्वांकडून कौतुक.

#हेडलाइन कोल्हापूरसह, सांगली, सातारा कराड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ तर उन्हाच्या कडाक्याला कंटाळेल्या नागरिकांना दिलासा.

 

Jai Maharashtra News - Live stream HD - Marathi News | जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE - https://www.youtube.com/watch?v=Ii5KkXsfYZc


(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)

loading...