Wednesday, 19 December 2018

#हेडलाइन्स @8.00am 260518

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन सलग तेराव्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ,पेट्रोल 13 पैश्यांनी तर डिझेल 16 पैश्यांनी महागलं, मुंबईत पेट्रोल 85 रुपये 78 पैसे तर डिझेल 73 रुपये 36 पैसे

#हेडलाइन पालघर पैसै वाटप प्रकरण तापलं, 12 तासानंतरही गुन्हा दाखल न झाल्यानं शिवसैनिक आक्रमक, शिवसेनेच्या खासदारांनी रात्री 2 वाजता डहाणू पोलीस ठाण्यात घेतली धाव

#हेडलाइन एसटी कर्मचाऱ्यांच्या आशा निराशेचा खेळ कायम, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वेतनवाढीच्या निर्णयाला आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार

#हेडलाइन वांद्रे - वरळी सी लिंकजवळ तरंगते क्रूझ हॉटेल बुडून दुर्घटना., कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश, कोणतीही जिवीतहानी नाही

#हेडलाइन अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवणाऱ्या नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना मुंबई उच्च न्यायालायाचा दणका, पाडलेलं बांधकाम स्वखर्चातून बांधून देण्याचे आदेश

#हेडलाइन नाशिकात महिलेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना ठोकल्या बेड्या, जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे महिलेला दाखवले आमिष

#हेडलाइन कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी बहुमत कसोटीत पास, जेडीएस काँग्रेसला 117 आमदारांचा पाठिंबा, कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

#हेडलाइन चातकासारखीचं वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी खुशखबर, मान्सून अंदमानात दाखल, हवामान विभागाची माहिती

#हेडलाइन आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना आंबा विक्री, मुंबईच्या डबेवाल्यांचा उपक्रम आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार थेट नफा, तर मुंबईकरांना मिळणार नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा

#हेडलाइन विठुरायाच्या पंढरीत कमला एकादशीचा उत्साह, विविध रंगी फुलांनी सजलं मंढिर, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

 

Jai Maharashtra News - Live stream HD - Marathi News | जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE - https://www.youtube.com/watch?v=Ii5KkXsfYZc


(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)

loading...