Monday, 21 January 2019

बजेटमुळे सर्व स्तरातील जनतेची निराशा झाली - धनंजय मुंडे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

GST लागू केल्यानंतर प्रत्यक्ष करात कपात करण्याचे आश्वासन जेटलींनी दिले होतेअर्थसंकल्पात मात्र प्रत्यक्ष करात वाढ करून वआयकरात कपात न करण्याचे धोरण ठेवून अगोदरच वाढलेल्या महागाईला आमंत्रण दिले आहे. त्यामुळे सर्व स्तरातील जनतेची निराशा झाली आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केलीय.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेट मध्ये गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा केली असली तरी वाढलेल्या गॅसच्या किमतीमुळे या गरीब महिलांना हा गॅस परवडेल का ? याचा मात्र विचार केला नाही.

नोटाबंदीमुळे उद्योगांना झालेल्या नुकसानीपोटी त्यांना पॅकेज दिले.  नोटाबंदीमुळे कृषी क्षेत्राचे 60 ते 70 हजार कोटी रुपयांचे जे नुकसान झाले आहे त्या बाबत मात्र अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतूद न केल्यामुळे शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली आहेत. 

ट्वीटरद्वारे धनंजय मुंडेंनी आपली प्रतिक्रिया दिली.  

loading...