Monday, 21 January 2019

बजेट नंतर महागाईचा भडका उडणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज संसदेत सादर केला. भविष्यात देशातील जनतेला महागाईचे चटके बसतील, अशी शक्यता या सर्वेक्षण अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. तसंच २०१८-१९ या आर्थिक वर्षात विकासदर ७ ते ७.५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सूत्रांनुसार, चालू आर्थिक वर्षात विकासदर ६.५ टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवालातील ठळक बाबी:

  • २०१८-१९ मध्ये आर्थिक विकासदर ७ ते ७.५ टक्के राहील.
  • चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकासदर ६.७५ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज
  • जीएसटीमुळे अप्रत्यक्ष कर भरणाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांची वाढ
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती ही चिंताजनक बाब
  • कच्च्या तेलाच्या दरात १२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता
  • खासगी गुंतवणुकीत सुधारणा होण्याचे संकेत
  • निर्यातीत लक्षणीय सुधारणा होणार
  • चालू आर्थिक वर्षात कृषी विकासदर २.१ टक्के राहण्याचा अंदाज
  • २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३.२ टक्के वित्तीय तुटीचा अंदाज  
loading...