Friday, 18 January 2019

शास्त्रांनुसार कशी असावी 'इको-फ्रेण्डली' गणेशमूर्ती?

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

दरवर्षी गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. गणेशोत्सव सण जवळ येताच रस्ते मंडपांनी भरून जातात आणि सुंदर अशी गणपती मूर्ती, फुलझाडे, पूजा, सजावट इत्यादी गोष्टी बाजारात विक्रीस येतात. दरवर्षी विविध आकार आणि रंगांमधून गणपतीच्या मूर्ती आकर्षित करतात.

काही गणपतीच्या मूर्ती इतर देव स्वरूपांची वैशिष्ट्ये दर्शवितात. या स्पर्धात्मक बाजारपेठेत, आपण बऱ्याचदा कलारूपांचा अनादर करतो. आपण मनुष्य हीच ईश्वराची निर्मिती आहे, आणि आपण देवाचे रूप बदलणे हे अयोग्यच आहे. गणेश मूर्ती पीओपी आणि हानिकारक रंगांनी बनवणे म्हणजे पर्यावरणाला हानी पोहोचवण्याबरोबरच आपण अनेक भाविकांच्या भावनाही दुखावतो. गणपती विसर्जनानंतर तर किनाऱ्यावर गणेश मूर्तीच्या अवयवाचे तुकडे पडल्याचे भयानक दृश्यही पाहावं लागतं.

गणपतीची मूर्ती वेगवेगळ्या स्वरूपात, रंगात, पाहायला मिळतात. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत गणपतीच्या रुपाचे वर्णन केले आहे.  गणेशाचे सर्व गुणधर्म आणि गुणधर्मांचे वर्णन 'भारतीय संस्कृती कोशाच्या 'मूर्तीविज्ञान'' श्लोकामध्ये लिहिलेले आहे.

गणपती 'अथर्व शीर्षम' मधल्या एका विशिष्ट श्लोकमध्ये भगवान गणेशच्या रुपाचं वर्णन केलं आहे. या श्लोकात म्हटल्याप्रमाणे गणेशाची मूर्ती बनवण्यात यावी तसंच गणेशाची मूर्ती शाडूच्या मातीची असावी जेणेकरून पर्यावरणाचं संरक्षण होईल, आणि असं केल्यास गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावर प्रसन्न होईल.

आपण इको- फ्रेंडली गणपतीची मूर्ती कशी बनवू शकतो?

पीओपीऐवजी शाडू माती गणपतीची मूर्ती निवडा.

प्रत्येक जण इको फ्रेंडली गणेशोत्सव करू इच्छिता! आमच्याकडे अनेक पर्याय आहेत -

वृक्ष गणेशाची निवड - लाल माती, सेंद्रीय खत, नैसर्गिक रंग आणि बियाणे बनवलेली ही एकमेव मूर्ती विसर्जना नंतर एका वृक्षामध्ये विसर्जित करावी, म्हणजेच पर्यावरण पूरक काम करत असल्याचा आनंद मिळतो.

लाल मातीच्या गणेशमूर्तींचे आकर्षण - प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि शाडूच्या मातीला पर्याय म्हणून लाल मातीपासून बनविलेल्या मूर्ती तयार करता येतात. शेतातून चिकट लाल माती आणून ती क्रशनच्या मशिनने बारीक दळली जाते. पुढे दोन दिवस तिला पाण्यामध्ये भिजवतात. या मातीत कच्चा कापूस टाकून त्याचे एकजीव मिश्रण करतात त्यातूनच मातीचा लेप तयार होतो. शाडूच्या मातीपेक्षा हे मिश्रण टिकाऊ आणि स्वस्त असते. रंगकाम झाल्यावर मूर्ती लाल मातीची आहे.शाडूपेक्षा ती अधिक टिकाऊ असते आणि पाण्यातही पटकन विरघळते हे वैशिष्ट्य आहे.

पेपरमेशी मातीचा गणपती- 1 किलो पेपरमेशी माती (ही माती स्टेशनरी दुकानात मिळेल), पाणी, फिनिशिंगसाठी ब्रश, चाकू, बोर्ड आणि पॉलिथिन. या गणेश मूर्तीला आकार दिल्यानंतर तीन ते चार दिवस सावलीत वाळू द्या. नंतर त्यावर आपल्या आवडीप्रमाणे इको फ्रेंडली कलर करा किंवा सजवा.

कॉटन पल्पच्या मूर्ती - होजिअरी कापसाच्या पल्पपासून साचा तयार केला जातो आणि शेवटचा हात शाडूच्या मातीचा असतो
आम्हाला खात्री आहे की आपणही या वर्षी ईको फ्रेंडली गणपतीची मूर्ती आणाल!
                

loading...