Wednesday, 23 January 2019

अजय देवगणचा ‘टोटल धमाल’ लूक पाहिलात का ?

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसाठी 2018 हे वर्ष खास ठरले आहे. या वर्षात अजयचे ‘रेड’ आणि ‘सिम्बा’ हे 2 सुपरहिट सिनेमे प्रदर्शित झाले. यानंतर अजय त्याच्या आगामी प्रोजेक्टकडे वळला आहे. त्याचा ‘तानाजी’ आणि ‘टोटल धमाल’ हे चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहेत. काही दिवसापूर्वी ‘तानाजी’मधील अजयचा फर्स्ट लूकदेखील प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ‘टोटल धमाल’ या सिनेमातील फर्स्ट लूकही प्रेक्षकांसमोर आला आहे. टोटल धमालमधील अजयचा लूक समोर आल्यानंतर त्याने आणि चित्रपट व्यापार विश्लेषण तरण आदर्श यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे.

प्रदर्शित झालेल्या या लूकमध्ये अजय रावडी दिसत असून त्याच्या खांद्यावर एक माकड बसले आहे. विशेष म्हणजे अजयचा हा लूक पाहता ‘राजा और रॅन्चो’ या मालिकेची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

अजयने सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. या सिनेमात अजयसोबत माधुरी दीक्षित, अनिल कपूर झळकणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही हीट जोडी 17 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत.  

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 23 04:46:03 +0000 2019

आज 23-01-2019 काय आहे आपलं आजचं राशीभविष्य? वाचा- https://t.co/7m8MsWa9bs #Bhavishya #jyotish #astrology… https://t.co/Ermv6ISpkM
Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP