Wednesday, 23 January 2019

‘झुंड’चे शूटींग पूर्ण! नागपूरकरांचा निरोप घेताना बिग बी भावूक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अभिनेता अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून नागपुरात होते. याचे कारण अर्थातचं सगळ्यांना ठाऊकच आहे. ‘सैराट’ फेम नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटाचे शूटिंग नागपुरात सुरू होते. यादरम्यान अमिताभ यांनी नागपूरकरांचे प्रेम अनुभवले, तसेच नागपूरचा गारठाही अनुभवला. आपल्या सोशल मीडियावर ‘झुंड’च्या सेटवरचे अनेक अपडेट्स अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेत. पण ‘झुंड’चे शूटींग सरले अन् नागपूरकरांचा निरोप घेताना अमिताभ काहीसे भावूक झालेले दिसले. आपल्या सोशल अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘एखादी गोष्ट सुरू करुन जेव्हा सोडण्याची वेळ येते तेव्हा त्याबद्दलच्या भावना या वेगळ्याच असतात.... , असे अमिताभ यांनी लिहिले. शेवटी त्यांनी ‘झुंड’च्या अख्ख्या टीमचे आभारही त्यांनी मानले.

यापूर्वी अमिताभ यांनी गावाकडच्या आठवणींना उजाळा दिला होता. ‘झुंड’च्या निमित्ताने अनुभवायला मिळालेल्या बैलगाडीच्या प्रवासाचे, खाटेवरच्या झोपीचे काही क्षण त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले होते. ‘बडे दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा और बैल गाडी की सवारी की...’, असे लिहित त्यांनी काही फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

अमिताभ आता 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 23 04:46:03 +0000 2019

आज 23-01-2019 काय आहे आपलं आजचं राशीभविष्य? वाचा- https://t.co/7m8MsWa9bs #Bhavishya #jyotish #astrology… https://t.co/Ermv6ISpkM
Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP