Wednesday, 23 January 2019

रजनीकांतच्या ‘पेट्टा’ची लहर... वेड्या फॅनने केला कहर!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत यांचं फॅन फॉलोइंग किती भन्नाट आहे, याचे आत्तापर्यंत आपण अनेक किस्से ऐकले असतील. नुकताच रजनीकांतचा नवा तामिळ सिनेमा ‘पेट्टा’ पहाटे 3 वाजताच थिएटरमध्ये झळकला आणि फॅन्सनी रात्रीपासूनच ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’साठी थिएटरबाहेर गर्दी केली. यात एका फॅनने तर कहर केलाय. ज्या थिएटरमध्ये रजनीकांतचा हा सिनेमा सुरू आहे, त्या थिएटरसमोर मांडव घालून या फॅनने आपलं लग्नच लावलं.

तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांची लोकप्रियता अभूतपूर्व आहे. लोक त्यांचा सिनेमा रिलीज होताना त्यांच्या पोस्टरची मिरवणूक काढतात. त्याच्या भव्य कटआऊट्सला दुधाने अंघोळ घालतात. त्यांना देव मानून थिएटरबाहेर चप्पला काढून जाणारेही फॅन्स आहेत. त्यांचा सिनेमा रिलीज होताना अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यादिवशी सुट्ट्या जाहीर केल्या जातात. इतकी लोकप्रियता क्वचितच एखाद्या सुपरस्टारला मिळते. या सर्वांवर कडी करत आपल्या थलैवाच्या साक्षीने विवाहबद्ध व्हायचा घाट काही जोडप्यांनी घातला.

‘पेट्टा’ सिनेमा सुरू असलेल्या चेन्नईतील ‘वूडलॅण्ड’ थिएटरबाहेर रस्त्यातच मांडव उभा करून एका रजनी फॅनने लग्न केलं. तामिळ लोकांचा पोंगल हा सण संक्रांतीच्या बरोबरीने म्हणजे पाच दिवसांनी आहे. मात्र ज्या दिवशी आपल्या लाडक्या सुपरस्टार रजनीकांतचा सिनेमा रिलीज होतो, तो दिवस म्हणजेच आपल्यासाठी ‘पोंगल’ असल्याचं त्याच्या फॅन्सचं म्हणणं आहे. त्यामुळे या ‘पोंगल’ सणाइतकाच रजनीकांतच्या सिनेमाची रिलीज डेट शुभ मानून या जोडप्याने विवाह केला. या शुभमुहुर्तावर थिएटरमध्ये रजनीकांतचा धमाका सुरू असताना त्याच्या साक्षीनेच लग्न करण्याचा त्यांचा बेत होता. विवाहाला नातेवाईकांबरोबरच सिनेमासाठी आलेल्या इतर फॅन्सनीही हजेरी लावली. ‘पेट्टा’ पाहायला आलेल्या सर्व फॅन्सच्या खानपानाची सोयही या लग्नात करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच रजनीकांत यांच्या ‘2.0’ या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. त्यानंतर आता तामिळमध्ये रिलीज झालेल्या ‘पेट्टा’लाही लोकांनी डोक्यावर घेतलंय.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 23 04:46:03 +0000 2019

आज 23-01-2019 काय आहे आपलं आजचं राशीभविष्य? वाचा- https://t.co/7m8MsWa9bs #Bhavishya #jyotish #astrology… https://t.co/Ermv6ISpkM
Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP