Wednesday, 23 January 2019

दीपिका पादुकोण पुन्हा होणार रणवीरची ‘पत्नी’

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच रणवीर सिंगसाठी 2018 हे वर्ष खूपच खास आहे. गत नोव्हेंबरमध्ये रणवीने दीपिकासोबत 6 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले. रणवीरच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचं झालं तर 2018च्या वर्षा अखेरीस रिलीज झालेला 'सिम्बा' बॉक्स ऑफिसवर हिट गेला. दीपवीरच्या फॅन्ससाठी नव्या वर्षात एक मस्त सरप्राईज आहे.

माहितीनुसार दीपिका पादुकोण लग्नानंतर पहिल्यांदाच ऑनस्क्रीन रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. लवकरच रणवीर '83' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. एका रिपोर्टनुसार सिनेमात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी दीपिका पादुकोणला विचारण्यात आलं आहे. दीपिकाने जर या भूमिकेसाठी होकार दिला तर हा सिनेमा दीपवीरच्या फॅन्ससाठी एक स्पेशल ट्रीट असणार आहे. या भूमिकेसाठी आधी कॅटरिना कैफचे नाव चर्चेत होते. मात्र आता ही भूमिका दीपिका पादुकोण साकारणार असल्याची चर्चा आहे.

‘83' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कहाणी सांगणारा आहे. 198 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा 10 एप्रिल, 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP
Jai Maharashtra News
Tue Jan 22 16:51:57 +0000 2019

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील जागा सोडून नांदेडमधून लढणार? नांदेड काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ? काय आहे या… https://t.co/kIrairDeOW