Wednesday, 23 January 2019

सोनचिडिया’चा ट्रेलर रिलीज, चंबळच्या दरोडेखोरांची दमदार कथा

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सुशांत सिंह राजपूत, भूमी पेडणेकर, मनोज बाजपेयी आणि रणवीर शौरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सोनचिडिया’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाची गोष्ट 1975 साली लागू केलेल्या आणीबाणीवर आहे. या आणीबाणीनंतर चंबळमधल्या दरोडेखोरांचे आयुष्य पूर्णपणे बदलते याच गोष्टीवर ‘सोनचिडिया’ हा सिनेमा आधारित आहे.

चंबळमध्ये राज्य करणाऱ्या दरोडेखोरांच्या आयुष्यात आणीबाणीनंतर वादळ येते आणि पुढे एकापाठोपाठ एक गुन्हे घडत जातात, अशा स्वरुपाची कथा ‘सोनचिडिया’मध्ये पाहायला मिळणार आहे. सुशांत सिंग राजपुत आणि भूमी पेडणेकर या सिनेमात पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. भूमी आणि सुशांत हे दोघेही चंबळमधल्या दरोडेखोरांच्या भूमिकेत आहे.

या सिनेमातील बरीचशी दृश्य चंबळमध्ये चित्रीत करण्यात आली आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केलं आहे. 8 फेब्रुवारी 2019 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना मोठ्या पदड्यावर पाहायला मिळणार आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 23 04:46:03 +0000 2019

आज 23-01-2019 काय आहे आपलं आजचं राशीभविष्य? वाचा- https://t.co/7m8MsWa9bs #Bhavishya #jyotish #astrology… https://t.co/Ermv6ISpkM
Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP