Wednesday, 23 January 2019

‘बिग बॉस 12’ची विजेती दीपिका कक्करला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

‘बिग बॉस 12’ची विजेती दीपिका कक्कर हिने एकीकडे ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करतेय, दुसरीकडे अनेकजण तिच्या या विजयावर नाराज आहेत. यामध्ये माजी क्रिकेटपटू श्रीसंतच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. श्रीसंतच्या एका चाहत्याने तर दीपिकावर अ‍ॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

स्वत:ला श्रीसंतचा चाहता सांगणा-या एका युजरने ही धमकी दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये या युजरने दीपिकासाठी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. तू कुठेही दिस, अ‍ॅसिड फेकून तुला मारेल, असे या युजरने म्हटले आहे.

दीपिकाच्या एका चाहत्याची नजर या युजरच्या ट्वीटवर पडली अन त्याने लगेच याबद्दल मुंबई पोलिसांना सूचित केले. मुंबई पोलिसांनीही लगेच या तक्रारीची दखल घेतली. Dipika Kakar™💫BB12 Winner🏆 या नावाने चालवण्यात येत असलेल्या दीपिकाच्या फॅन पेजवर ट्वीट करत, या प्रकरणात लक्ष घालण्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

‘बिग बॉस 12' सिजनमध्ये टीव्ही कलाकार दीपिका कक्कर आणि माजी क्रिकेटपटू श्रीसंत यांच्यात फिनालेसाठी मोठी स्पर्धा रंगली. अखेर दीपिका कक्कर या शोची विजेती ठरली. दीपिका ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करत असली, तरी दुसरीकडे मात्र अनेकजण तिच्या या विजयावर नाराज आहेत.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 23 04:46:03 +0000 2019

आज 23-01-2019 काय आहे आपलं आजचं राशीभविष्य? वाचा- https://t.co/7m8MsWa9bs #Bhavishya #jyotish #astrology… https://t.co/Ermv6ISpkM
Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP