Wednesday, 23 January 2019

रोहितने आपल्या नन्ही परीचं ‘हे’ ठेवलं नाव, शेअर केला सुंदर फोटो

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका यांना 30 डिसेंबरला कन्यारत्न झाले होते. रोहित ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असल्याने त्याला आपल्या मुलीला भेटता आले नव्हते. पण आता चौथ्या कसोटी सामन्यात खेळत नसल्यामुळे रोहितने आपल्या मुलीला भेटण्यासाठी थेट मुंबई गाठली. यावेळी रोहितने आपल्या लेकीचे नावही ठेवले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याच्यासोबत एका मुलाखतीमध्ये रोहितने याबाबत माहिती दिली होती. या मुलाखतीत लवकरच मी बाबा होणार असल्याचे रोहितने स्पष्ट केले होते.

रोहितच्या या गुडन्यूजमुळे टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता.  अखेर रोहितच्या घरी या नवीन पाहुण्याचं आगमन झालं. त्यानुसार रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. रोहितने आपल्या लेकीचे नाव ‘समायरा’ असे ठेवले आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 23 04:46:03 +0000 2019

आज 23-01-2019 काय आहे आपलं आजचं राशीभविष्य? वाचा- https://t.co/7m8MsWa9bs #Bhavishya #jyotish #astrology… https://t.co/Ermv6ISpkM
Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP