Wednesday, 23 January 2019

2019 मध्ये ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता चढणार बोहल्यावर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

2018 हे वर्ष बॉलिवूडसाठी लगीसराईचे ठरले सोनम कपूर-आनंद अहुजा, प्रियांका चोप्रा-निक जोनास आणि दीपिका पादुकोण-रणवीर सिंग हे सेलिब्रेटी या गतवर्षी विवाहबंधनात अडकले. पण आता यावर्षी कोणत्या सेलिब्रेटींच्या घरी लग्नाचे सनई-चौघडे वाजणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

varun-natasha-pic.png

 

या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नावं येतेय वरूण धवनचं. अभिनेता वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत यावर्षीच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. रिपोर्टनुसार वरुण नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहे. वरूण व नताशा या दोघांच्या नात्यावर दोन्ही कुटुंबांनीही पसंतीची मोहोर लावली आहे आणि दोघांच्या लग्नाची तयारीही सुरु झाली आहे. याबाबत वरुणकडून अजून कोणतेच अधिकृत वक्तव्य आलेले नाही मात्र तो लवकरच आपल्या लग्नाची तारीख चाहत्यांसोबत शेअर करण्याची शक्यता आहे. नताशा ही वरुणची बालपणीची मैत्रिण आहे. वरूण व नताशा अनेकदा एकत्र दिसले आहेत. वरुणच्या घरच्या प्रत्येक इव्हेंटला नताशा व तिचे कुटुंब हजर असतात. मात्र दोघांनी आपले नाते कधीच स्वीकारले नव्हते.

varun-natasha-pic2.png

 

वरुण लवकरच त्याचा आगामी सिनेमा 'कलंक'मध्ये आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, संजय दत्त आणि माधुरी दीक्षितबरोबर दिसणार आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP
Jai Maharashtra News
Tue Jan 22 16:51:57 +0000 2019

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील जागा सोडून नांदेडमधून लढणार? नांदेड काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ? काय आहे या… https://t.co/kIrairDeOW