Wednesday, 23 January 2019

महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा मोठा स्टार नाही - आमिर खान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा मोठा स्टार नाही. त्यामुळे ठाकरे सिनेमा प्रदर्शित होत असताना अन्य सिनेनिर्मात्यांना त्या दिवशी आपला सिनेमा प्रदर्शित करावासा वाटणार नाही, असे वक्तव्य अभिनेता आमिर खानने केले आहे.

शुक्रवारी मुंबईत एका अभिनेता आमिर खान यांच्या हस्ते अनावरण करण्यात करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी आमिर खानला ठाकरे सिनेमासंदर्भात प्रश्न विचारला. यावर आमिर म्हणाला, महाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा कोणीही मोठा स्टार नाही. ‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शित होताना कोणत्याही सिनेनिर्मात्याला त्यावेळी आपला सिनेमा प्रदर्शित करावासा वाटणार नाही. प्रत्येक निर्मात्याला चांगल्या दिवशी आपला सिनेमा प्रदर्शित व्हावा असे वाटते. पण ज्यावेळी मोठा सिनेमा येणार असतो तो सिनेमा आणि आपला सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होऊ नये असेही त्याला वाटत असते. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे स्टार होते आणि बाळासाहेबांवरील चित्रपट महाराष्ट्रात प्रत्येकालाच पहावासा वाटेल. त्यामुळे त्या दिवशी कोणताही निर्माता आपला सिनेमा प्रदर्शित करु इच्छिणार नाही, असे आमिर खान म्हणाला आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP
Jai Maharashtra News
Tue Jan 22 16:51:57 +0000 2019

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील जागा सोडून नांदेडमधून लढणार? नांदेड काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ? काय आहे या… https://t.co/kIrairDeOW