Saturday, 15 December 2018

इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बॉलीवुड अभिनेता इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टीजर आज रिलीज करण्यात आला आहे. ‘ऊपरवाला दुआ कबुल करता है, मैं सिर्फ कॅश लेता हूं,’ इमरानच्या या डॉयलॉगने टीजरची सुरुवात होते. त्याच्या या डायलॉगवरून देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे वास्तव आपण समजू शकतो. तसेच 'नकल में ही अक्‍ल है’ अशी या सिनेमाची खास टॅगलाइन आहे. या सिनेमात इमरानने डोनेशन घेऊन मुलांचे अ‍ॅडमिशन करून देणाऱ्या राकेश सिंह नावाचे पात्र साकारले आहे. नुकताच या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते.

या सिनेमाची निर्मिती टी-सीरिज, अतुल कासबेकर व तनुज गर्गच्या एलिप्सिस एण्टरटेन्मेंट आणि इमरान हाश्मी करत आहेत. या सिनेमात इमरान हाश्मीसह श्रेया धनवंतरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य