Monday, 10 December 2018

#MeToo प्रकरणी ‘कुक्कू’ ‘गायतोंडे’च्या पाठीशी!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीवर विरोधात माजी मिस इंडिया निहारिका सिंग हिने केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मात्र ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमध्ये नवाजुद्दिन सिद्दिकीसोबत काम करणाऱ्या अभिनेत्री कुब्रा सैटने नवाजला पाठिंबा दर्शवला आहे.

निहारिका सिंगने नवाजबद्दल लिहिताना म्हटलं होतं, की फइल्मी दुनियेमध्ये नवाज एक चांगला माणूस वाटला होता. म्हणून माझ्या मनात त्याच्याबद्दल चांगली भावना होती. मात्र एक दिवस तिने नवाजला घरी नाश्ता करण्यासाठी बोलावलं असताना नवाजने अचानक तिला धरलं. तिने नवाजला ढकलून द्यायचा प्रयत्न केला, पण बधला नाही. त्याच्या वारंवार खोटं बोलण्याच्या स्वभावामुळे मी त्याला सोडून दिलं, असं निहारिकाने स्पष्ट केलंय. तिने नवाजुद्दिनला ‘एक वासनापीडित भारतीय पुरूष’ म्हटलंय.

 

मात्र नवाजुद्दिनवर आरोप झाल्यावर त्याची सहकलाकार कुब्रा सैट हिने ट्विट करून नवाजला पाठिंबा दर्शवलाय. ‘बिघडलेले संबंध म्हणजे #MeToo नव्हे. एखाद्याची बाजू घेण्यापूर्वी  कोणीही याबाबतीत गल्लत करू नये. मी नवाजुद्दिन सिद्दिकीच्या पाठिशी आहे. निहारिकासाठी इंडस्ट्रीमध्ये हे सगळं कठीण गेलं असणार, हे मी समजू शकते. पण एखाद्याच्या खासगी नात्यातील गोष्टीला #MeToo शी जोडणं चूक आहे. माणूस म्हणून आपल्या प्रत्येकात काहीना काही दोष असतो. तो स्त्री-पुरूष भेदावर अवलंबून नसतो.’

 

कुब्रा सैटने नवाजुद्दिनसोबत सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये काम केलंय. या मालिकेत तिने साकारलेल्या ‘कुक्कू’ या तृतीयपंथीच्या भूमिकेबद्दल तिचं खूप कौतूक झालं. तसंच तिने नवाजसोबत केलेल्या नग्न दृश्याचीही खूप चर्चा झाली. नवाजुद्दिनने या मालिकेत गणेश गायतोंडे या अंडरवर्ल्ड गुंडाची भूमिका केली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य