Thursday, 15 November 2018

शाहिद मीराच्या बेबी बॉयसाठी चाहत्यांनी सुचवली मजेशीर नावे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली
बॉलिवुड अभिनेता शाहिद कपूर आणि मिरा राजपूत कपूर यांना बुधवारी पुत्ररत्न प्राप्त झाला आहे.

मीरा आणि शाहिद दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत, संपूर्ण घरात खूप आनंदी वातावरण आहे.

या बाळाच्या जन्मानंतर शाहिद व मीरावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, तर दुसरीकडे शाहिद आणि मीरा आपल्या दुस-या बाळाचे नाव काय ठेवणार, याबाबतची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.
बाळाच्या जन्माची बातमी कळताचं काल रात्रीपासूनचं सोशल मीडियावर शाहिद व मीराच्या नव्या बाळाचे नाव ट्रेंड झालं आहे.

शाहिदच्या चाहत्यांनी दोघांना बाळाचे नाव काय असावे याबद्दल अनेक आईडिया सुचविण्यास सुरुवात केली आहे, चाहत्यांनी सुचविलेली ही नावे अगदी मजेशीर आहेत.

शाहिद व मीराने आपल्या पहिल्या मुलीचे नाव मीशा ठेवले. हे नाव शाहिद व मीरा या दोन नावांतील आक्षरांवरून ठेवण्यात आले होत़े.

मीराच्या नावातील ‘मी’ आणि शाहिदच्या नावातील ‘शा’ या शब्दांवरून चाहत्यांनी मीरा व शाहिदच्या दुस-या मुलासाठीही अनेक नाव सुचवले आहे.
काहींनी मीराच्या नावातील शेवटचे अक्षर ‘रा’ आणि शाहिदच्या नावातील शेवटची दोन अक्षर ‘हिद’ असे मिळून राहिद हे नाव सुचवले आहे.

तर काहींनी शाहीद आणि मीशाच्या नावावरूनचं आपल्या बाळाचे नाव शमी ठेवावे असेही सुचवले आहे.


मात्र आता शाहिद आणि मीरा चाहत्यांनी सुचवलेल्या या नावाचा विचार करतील की आपल्या बाळाचे नाव आणखीन काही स्पेशल ठेवतील याकडेचं सर्वांच लक्ष लागून राहिल आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य