Sunday, 18 November 2018

‘सुई धागा’चे ट्रेलर रिलीज...वाचा सिनेमाबद्दल थोडक्यात...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

वरुण धवन आणि अनुष्का शर्माच्या ‘सुई धागा’ या चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला. 3 मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथा अगदी चांगल्या पद्धतीने दर्शविण्यात आली आहे. ही कथा आहे ममता आणि मौजीची जे आपल्या आयुष्यात ठेस लागूनही अपार कष्ट करुन आपल्या अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांना पूर्ण करण्यात यश मिळवतात.

वरुण धवन, अनुष्का शर्माच्या सुंदर भूमिकेने सजलेल्या चित्रपटाचे निर्देशन शरत कटारिया यांनी केले आहे. चित्रपटात वरुण आणि अनुष्का पति – पत्नि आहेत. शरतने याआधी 'दम लगाके हइशा' सारख्या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आहे. मनिष शर्माने या चित्रपटाला प्रोड्यूस केले आहे. या चित्रपटाची शूटींग जास्तीत जास्त मध्यप्रदेशमध्ये करण्यात आले आहे.

  • अनुष्का शर्मा आणि वरुण धवन स्टारर शरत कटारिया दिग्दर्शित ‘सुई धागा’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच 
  • यश राज बॅनरची निर्मिती असणाऱ्या या सिनेमाच्या निमित्ताने अनुष्का-वरुण पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील.
  • अनुष्का आणि वरुणने या सिनेमात अगदी साधा लुक ठेवलाय.
  • वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या शिर्षकातून ‘मेक इन इंडिया’चा प्रचारसुद्धा करण्यात आलाय

वरुण आणि अनुष्काने दिली सिनेमाची थोडक्यात माहिती -

सुई धागा’या सिनेमाची कहाणी ही मौजी आणि ममता या जोडप्याभोवती फिरते. एका छोट्या शहरातील दांम्पत्याची आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी प्रेक्षकांना यातून पाहायला मिळेल... ममता ही पत्नी म्हणून आपल्या नवऱ्याला स्वाभिमानाने उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देते... यासोबतच त्या दोघांचा ‘सुई धागा’मय प्रवास चालू होतो आणि चित्रपटाची कथा उलगडत जाते....

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य