Wednesday, 15 August 2018

सलमानच्या मेहुण्याची हिरोगिरी प्रेक्षकांच्या भेटीला...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा लवरात्री या चित्रपटातून आपलं बॉलीवूड डेब्यू करणार आहे, या  चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. 

हा चित्रपट सलमान खानच्या प्रोडक्शनने बनवला असून अभिराज मानीवाला यांनी हा चित्रपट डायरेक्ट केला आहे. या ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथा गुजराती रंगा-ढंगात दिसत आहे.

या चित्रपटात आयुष शर्मा गरबा टिचरची भूमिका साकारत आहे.

 चित्रपटातील लीड एक्ट्रेस वरीना हुसैनदेखील या चित्रपटाद्वारे आपला बॉलीवुड डेब्यू करत आहे. चित्रपटात आयुष आणि वरीना यांची लवस्टोरी नवरात्री सणांमध्ये दाखवण्यात आली आहे.

ट्रेलरनुसार चित्रपटाची कथा गुजरातमधील एका शहरात गरबापासून सुरु होते. हीरो फिल्मी अंदाजात आपल्या प्रेमाला मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. या चित्रपटात राम कपूर आणि रॉनित रॉयदेखील महत्वाची भूमिका साकारत आहेत. या दोघांच्या एन्ट्रीनंतर चित्रपटात ट्विस्ट येतो.

ट्रेलरच्या शेवटी मात्र सर्वात मोठ सरप्राइज पहायला मिळत आहे. यामध्ये सलमानचे भाऊ अरबाज आणि सोहेल खानदेखील दिसत आहेत. लवरात्री चित्रपट पूर्णपणे खान कुटुंबियांचा आहे.

या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, 5 ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Aug 15 08:11:36 +0000 2018

ट्विटर लाइट अॅप आता भारतातही उपलब्ध... - https://t.co/UqmEqzL3yZ #twitterlite #technology #tech @MarathiRT… https://t.co/t8RzZVx6ce
Jai Maharashtra News
Wed Aug 15 06:32:54 +0000 2018

धनगर आरक्षणासाठी परभणीत तुळशीराम सोन्नर या 23 वर्षीय तरूणाची आत्महत्या - https://t.co/CQeCJ1D8LR #पाहाJMLive https://t.co/pPOeWARyYi

Facebook Likebox