Wednesday, 16 January 2019

Friendship Day : सोनाली बेंद्रेचं आणखी एक भावूक ट्वीट...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काही दिवसांपूर्वी सोनालीने मुलगा रणवीरसोबतचा फोटो शेअर करत, एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आज फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने सोनालीने आपल्या सोशल अकाऊंटवर दोन मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर करत, सर्व मित्रांचे आभार मानले आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे हा फोटो काहीसा भावूक करणारा आहे. पण सोनालीचा मॅसेज मात्र खूपच पॉझिटीव्ह आहे. या फोटोत सोनाली बॉल्ड लूकमध्ये दिसतेय. म्हणजे, तिने डोक्याचे मुंडण केले आहे. पण तिच्या चेहऱ्यावरची भलीमोठी स्माईल नवी उमेद देणारी आहे.

हा फोटो हृतिक रोशनने काढला असून या फोटोत सोनाली तिच्या दोन मैत्रिणींसोबत आहे. यातील एक आहे, हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान ही आहे.

हा फोटो शेअर करत सोनाली लिहिते, ‘ ही मी आहे आणि सध्य खूप आनंदी आहे. मी आनंदी असल्याचे सांगते, तेव्हा ते माझ्याकडे काहीशा विचित्र नजरेने बघतात. आयुष्याचा प्रत्येक क्षण मी मनमुराद जगते आणि प्रत्येक क्षण सेलिब्रेट करण्याची संधी शोधत असते. हो, सध्या मी वेदनेतून जातेय. पण आता मला जे आवडते, तेच मी करते, ज्यांच्यावर प्रेम करते, त्यांच्यासोबत वेळ घालवते. मी खूप नशिबवान आहे की, माझे मित्र त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मला भेटायला येतात. मला कॉल करतात. मी एकटी नाही, याची जाणीव मला करून देतात. मला इतके प्रेम दिल्याबद्दल, आभाऱ़़ ,’ असे सोनाली म्हणाली. ‘आजकाल मला तयार व्हायला खूप कमी वेळ लागतो. कारण केसांचे काहीही करावे लागत नाही,’असेही तिने लिहिले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 16 07:53:09 +0000 2019

अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान बजेटला मुकणार ? वाचा सविस्तर - https://t.co/QBQt0kPpA6 #ArunJaitley #Budget2019… https://t.co/QcIbUZiKP6
Jai Maharashtra News
Wed Jan 16 07:25:21 +0000 2019

अखेर बेस्ट संपावर तोडगा निघाला 8 दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे वाचा सविस्तर - https://t.co/QEks9HmvJi… https://t.co/EIrisBh5Kh