Sunday, 20 January 2019

सोनालीने शेअर केली मुलासाठी भावूक पोस्ट....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यू्ज, मुंबई

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हाय ग्रेड कॅन्सरवर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. सोनालीने स्वत: सोशल मीडियावर या आजाराची माहिती दिली होती. 

परंतू ही बातमी स्वत:च्या मुलाला सांगणे सोनाली आणि तिचा पती गोल्डी बेहल या दोघांसाठीही सर्वात कठीण काम होते. पण सोनाली व गोल्डी दोघांनीही ही स्थिती धीराने आणि संयमाने हाताळत त्याला ते सांगितलं. याबाबत खुद्द सोनालीने ट्विटरवर एक पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे.

"माझा १२ वर्षे ११ महिने आणि ८ दिवसांच्या मुलाला माझ्या आजाराची बातमी कशी सांगावी, हा प्रश्न आम्हाला पडला होता. पण त्याला ह्याबाबतची सत्य परिस्ठिती सांगणेही गरजेचे होते. प्रत्येकवेळी आम्ही त्याच्याशी प्रामाणिक होतो. आजपर्यंत आम्ही त्याच्यापासून काहीच लपवले नव्हते. यावेळी आम्ही हाच निर्णय घेतला आणि सगळे वास्तव त्याच्यासमोर ठेवले. त्याने बातमी अतिशय संमजपणे घेतली. इतकेच नाही तर माझ्यासाठी ऊर्जा आणि सकारात्मकतेचा स्रोत बनला/ आता अनेकदा तो माझ्या पालकाच्या भूमिकेत असतो," असे सोनालीने लिहिले आहे.  या पोस्टसोबत मुलासोबतचा फोटोही तिने शेअर केला आहे.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Jan 20 08:47:21 +0000 2019

अमित शाहांच्या प्रकृतीत सुधारणा दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयातून डिस्चार्ज वाचा सविस्तर - https://t.co/v5eDLOi7Gk… https://t.co/8mWKXlOTAx
Jai Maharashtra News
Sun Jan 20 06:05:53 +0000 2019

केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद तर महिला गटात इथियोपियाच्या अलेमूने मारली बाजी वाचा सविस्… https://t.co/rB8tlwDKWd