Wednesday, 18 July 2018

तारक मेहता का उल्टा चश्मामधील डॉ. हंसराज हाथी यांचे निधन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तारक मेहता का उल्टा चश्मा च्या प्रेक्षकांसाठी एक दुखद बातमी आहे. प्रसिद्ध टीवी सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये डॉ. हंसराज हाथींची भूमिका साकारणारे अभिनेता कवि कुमार आझाद यांचे हृदय विकाराचा झटक्याने निधन झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कवि कुमार यांना 3 दिवसांपूर्वी मीरा रोडच्या वोकहार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज म्हणजेच 9 जूलैला हृदय विकाराचा झटक्याने त्यांचा अकाली मृत्यू झाला.

कवि कुमार यांच्या निधनाची दुखद बातमी कळताचं फिल्म सिटीमध्ये सुरू असणारे शुटिंग थांबवण्यात आले आहे. कवि कुमार हे हसमुख आणि मन मोकळे व्यक्तिमत्व असणारे होते.

त्यांच्या अकाली निधनाची बातमी सर्वांसाठी धक्कादायकचं आहे. कवि कुमार यांनी अमिर खानच्या मेला आणि फंटूस या सिनेमासहित अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.

 

 

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jul 17 17:37:31 +0000 2018

कॅन्सरचा पराभव | Batmi ani Barach kahi Girl Fight against cancer 160718: https://t.co/HDZn2ggnjQ via
Jai Maharashtra News
Tue Jul 17 17:29:30 +0000 2018

शोकांतिका | Batmi ani Barach kahi Nallasopara dead body on Top of Rickshaw 160718: https://t.co/1SOMmuUWHa via

Facebook Likebox