Tuesday, 20 November 2018

बहुचर्चित 'संजू'चा ट्रेलर प्रदर्शित

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बहुचर्चित संजू या चित्रपटाचा पहिला ट्रेलर आज कलाकारांच्या उपस्थित पार पडला. अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारीत असलेल्या या चित्रपटाची तयारी, दोन वर्षापासुन सुरु होती. संजय दत्तचे आयुष्य हे नेहमीच वादग्रस्त राहीले असुन, निर्माता विधु विनोद चोपडा आणि दिग्दर्शक राजु हिरानी हे मात्र वास्तव बाजला ठेवुन फक्त टाळाटाळ करताना दिसलेत.

जो पर्यंत एखादी व्यक्ती गुन्हेगार म्हणून सिध्द होत नाही तोपर्यत ती निर्दोर्ष असते. या विचारसरणीने, विधु विनोद चोपडा यांनी संजय दत्त याला घेऊन अऩेक चित्रपट केलेत. त्यांच्या या कृतीबद्दल, फिल्म इंडस्ट्रीने बॅन केल्याची आठवण ते सांगतात. तेथे संजय दत्त याची इमेज पॉझेटिव्ह करण्याचे श्रेय देखील त्यांनाच जाते.

मुन्नाभाई या चित्रपटानंतर, संजय दत्त यांची इमेज बदलली गेली खरी. मात्र त्या इमेजला पडदयावर साकारताना, रणबीर कपुरला पाच तासाचा मेकअप करायला लागत होता. तर दुसरीकडे दिग्दर्शक राजु हिरानी हे चित्रपटातील अऩेक वादग्रस्त मुद्दे दडपण्याचा कसोशिने प्रयत्न करताना दिसले.

राजु हिरानी यांनी चित्रपटात, सलमान खान-संजय दत्त यांची मैत्री, माधुरी दिक्षित आणि संजय दत्त यांनी मैत्री, बाळासाहेब ठाकरे यांनी सुनिल दत्त यांना, संजय दत्तला सोडवण्यासाठी केलेली मदत, राकेश मारिया यांनी 1993 सालच्या बॉम्ब ब्लास्टसाठी केलेला तपास या मुद्यावर विचारता, निर्माता विधु विनोद चोपडा हे हिरानी यांचा बचाव करताना दिसुन आलेत.  

आमीर खान यांना सुनिल दत्त यांची भूमिका देण्यात आली होती. दंगल नंतर परत वडीलांची भूमिका करायची नाही हे सांगून नकार दिल्यावर, परेश रावल यांना ती भूमिका देण्यात आली. संजू या चित्रपटामध्ये दिया मिर्झा ही मान्यता दत्तच्या भुमिकेत तर सोनम कपूर हि रिया पिल्लेच्या भूमिकेत दिसेल. ड्रग, स्रीया, दारु यामध्ये जगलेल्या संजय दत्तच्या चुकींमधुन सगळ्यांनी शिकावे सांगणारा रणबीर, संजू मधील त्याच्या अभिनयक्षमतेने चकीत करेल यात वाद नाही.

‘मुन्नाभाई’च्या चाहत्यांसाठी खुशखबर...

संजय दत्तला, फॅन कडून अनोखी भेट

loading...

Top 10 News

राशी भविष्य