Thursday, 20 September 2018

सागरीका घाटगे नव्या इनिंगसाठी सज्ज

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

अभिनेत्री सागरिका घाटगे आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. मिलिंद उके दिग्दर्शित मान्सून फुटबॉल या सिनेमातून सागरिका झळकणार आहे. या सिनेमात सागरिका गृहिणींची भुमिका साकारणार आहे. संसार सांभाळता - सांभाळता फुटबॉलची टीम स्थापन करणाऱ्या गृहिणीची ही कथा आहे. या सिनेमात सागरिका फुटबॉलही खेळताना दिसणार आहे.

येत्या जुलैपासून या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. याआधी सागरिकाने शाहरुख खानसोबत चक दे इंडिया या सिनेमात काम केलं आहे. क्रीडा विषयाशी संबंधित हा तीचा दुसरा सिनेमा असणार आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये सागरिका क्रिकेटपटू झहीर खानसोबत विवाहबध्द झाली.

लग्नानंतर तीचा हा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. चक दे इंडियासारखा धुवा मान्सून फूटबॉल बॉक्स ऑफिसवर उडवणार का हे बघण्यासारखं असेल. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Sep 20 15:45:22 +0000 2018

यापुढे गोमातेचा आशीर्वाद घेताना गाय हंबरण्याऐवजी तुम्हाला 'आयुष्यमान भव' असा आशिर्वाद देईल लवकरच संस्कृत आणि तामिळम… https://t.co/BuBW8vc9jR
Jai Maharashtra News
Thu Sep 20 14:29:37 +0000 2018

शाओमीचा MiA2 'या' नव्या रंगात भारतात लाँच जाणून घ्या याचे फीचर्स आणि किंमत - https://t.co/Ajgy7C8p04 #Xiaomi #MiA2… https://t.co/haSBZ4UWMi

Facebook Likebox