Thursday, 15 November 2018

सोनमच्या रिसेप्शनमध्ये सलमान – अर्जुनचा कोल्ड वॉर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवूडमध्ये सध्याचे आघाडीचे असे अनेक कलाकार आहेत ज्यांना सलमान खान त्यांच्या बालपणापासून ओळखतो. काहींना तर त्याने आपल्या हाता - खांद्यावर खेळवलं आहे, त्यातीलच एक उदाहरण म्हणजे अर्जुन कपूर. सलमान आणि अर्जुनचे बाबा बोनी कपूर यांचे फार चांगले संबंध आहेत.

अर्जुनला सिनेसृष्टीत सलमाननेच आणले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण आता सलमान आणि अर्जुनमध्ये विस्तवही जात नाही. या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून कोल्ड वॉर सुरू आहे, त्यांच्यातले हे भांडण सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्येही लपले नाही. सलमानचा सोनमच्या रिसेप्शनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये सलमान अर्जुनला पाहून न पाहिल्यासारखे करतो हे स्पष्टपणे दिसत आहे. या पार्टीमध्ये सलमान अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत आला होता. हॉटेलमध्ये पोहोचताच सलमान सगळ्यांना आत्मियतेने भेटत होता. पण अर्जुन समोर असूनही सलमानने त्याच्याकडे पाहण्याची तसदी घेतली नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य