Wednesday, 21 November 2018

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ट्रोलरर्सने केले हैरान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अनेक वेळा चुकीच्या कारणांमुळे बॉलिवू़ड सेलिब्रेटींवर ट्रोल होण्याची वेळ येते. अशीच वेळ एका बॉलिवूड अभिनेत्रीवर आली आहे. ‘बाजीगर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यावेळी नेटक-यांच्या ट्रोलचा विषय ठरली आहे.

मासे पकडणे हे सोपं काम नाही, असं कॅप्शन देत शिल्पाने हा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओ पोस्ट होताच त्याच्यावर नेटक-यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली. ‘शिल्पा ‘पेटा’ या संस्थेची सदिच्छादूत असून तिच्याकडून या वर्तनाची अपेक्षा नव्हती. एका मुक्या प्राण्याला असा त्रास देणे शोभत नाही. तसेच शिल्पा एक ढोंगी आहे, ‘ असे एका ट्रोलरने शिल्पाला सुनावले आहे.

‘नेटक-यांचा रोष बघून शिल्पाने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून मी शाकाहारी आहे. त्यामुळे मी हा मासा खाण्यासाठी पकडला नव्हता. तसेच तो मी काही काळातच सोडून दिला. त्या माशाला कोणतीही इजा झालेली नाही’, असेही शिल्पाने यावेळी स्पष्ट केले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य