Sunday, 18 November 2018

जॅकी श्रॉफ - आदित्य पांचोली प्रथमच मराठी चित्रपटात एकत्र

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

‘हृदयनाथ’ हा सिनेमा येत्या रविवारी स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा एका प्रामाणिक शिक्षकाचा डॉन कसा होतो या संकल्पनेवर आधारित आहे.

या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी (२९ एप्रिल) दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून जॅकी श्रॉफ आणि आदित्य पांचोली प्रथमच मराठी चित्रपटात एकत्र आले आहेत. तर उर्मिला मातोंडकरचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकवेल.उर्मिला मातोंडकरचं ‘याना याना’ हे आयटम साँगही या सिनेमाचं आकर्षण आहे. नीलेश वाघमारे यांच्या हार्ट टू हार्ट प्रॉडक्शन निर्मिती हा सिनेमा अमर गुप्ते यांनी दिग्दर्शित केला आहे तर संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य