Thursday, 15 November 2018

102 NOT OUT - बिग बींच्या चित्रपटाच्या प्रिव्ह्यूला रेखा उपस्थित

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

बिग बींचा आगामी ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाचा प्रिव्ह्यू सिनेतारकांसाठी दाखवण्यात आला. सिनेतारकांसाठी विशेष आयोजित केलेल्या या चित्रपटाच्या प्रिव्ह्यूदरम्यान नीतू कपूर सह रेखा उपस्थित होत्या. काही बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. अशाच कलाकारांच्या यादीतील दोन नावं म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा.

रुपेरी पडद्यावरील सर्वांची आवडती जोडी म्हणून या दोन्ही कलाकारांकडे पाहिलं गेलं आहे. पण, त्याहीपेक्षा त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीविषयीच जाणून घेण्यात प्रेक्षकांनी रस दाखवला. अशातच जर बिग बींच्या अभिनयाची रेखा यांनी प्रशंसा केली तर त्याची चर्चा होणारच आहे. या चर्चेचं निमित्त  बिग बींचा आगामी ‘१०२ नॉट आऊट’ हा चित्रपट ठरला आहे. \रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची प्रशंसा केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य