Thursday, 15 November 2018

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-बाबा बनणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक आई-बाबा बनणार आहेत. आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सानियाने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सानियाने, आपल्या मुलाचं नाव मिर्झा मलिक असं ठेवणार असल्याचं सांगितलं. माझ्या आणि शोएबच्या नावाने माझं मुल भविष्यात ओळखलं जावं अशी माझी इच्छा असल्याचं सानियाने म्हटलं होतं.

३१ वर्षीय सानिया मिर्झाने २०१० साली पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला होता. हैदराबादमध्ये पारंपरिक पाकिस्तानी पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला होता. यानंतर तब्बल ८ वर्षांनी सानिया आणि शोएबच्या घरात पाळणा हलणार आहे. २००४ साली सानिया मिर्झाला अर्जुन तर २००६ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य