Wednesday, 21 November 2018

15 एप्रिलपासून मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटीला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

हिंदीतील बिग बॉस आपल्या सर्वांनाच माहित असेल. त्याच धरतीवर आता आपल्याला मराठीतही बिग बॉस बघायला मिळणार आहे. कारण लवकरच मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या शोच्या सूत्रसंचालनाची कमान मराठी इंडस्ट्रीचे बॉस असलेले महेश मांजरेकर यांच्याकडे असणार आहे. बिग बॉसच्या घरातल्या सर्व सदस्यांशी ते संवाद साधणार आहेत.

मराठी बिग बॉसमध्ये नेमके कोणकोणते मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत. याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. येत्या पंधरा एप्रिलपासून मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची बिग बॉसच्या घरात वर्णी लागल्याचं कळतंय.   यांच्या पाठोपाठ कोणत्या मराठी सेलिब्रेटींची वर्णी लागणारेय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य