Thursday, 15 November 2018

वोग मॅगझीनसाठी ऐश्वर्याचं फोटोशूट, सोशला मिडियावर झाली ट्रोल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

42 वर्षीय बॉलिवूड अॅक्टर ऐश्वर्या राय बच्चनने नुकतेच एक फोटोशूट केलयं. फॅशन मॅगझीन वोगसाठी ऐशने फोटोशूट केलयं. मात्र, या फोटोशूटमध्ये ऐश्वर्या सोशल मिडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे.

aish1.png

यामध्ये ती हॉलिवूड सिंगर फैरेल विलियम्ससोबत बोल्ड अंदाजात दिसलीय. ऐश्वर्याने एप्रिल महिन्यासाठी अमेरिकन रैपर फैरेलसोबत हे कूल फोटोशूट केले आहे.

aish3.png

मॅगझिनच्या कवर पेजवर ऐश्वर्या निळ्या रंगाच्या गाउनमध्ये खूप सुंदर दिसतेय, तर फैरेलचा रंगीबेरंगी अंदाज पाहायला मिळतोय. मात्र, ऐश्वर्याच्या या फोटोशूटला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवलीय. हे फोटोशूट नसून फोटोशॉप आहे, असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

aish4.png

तसेच, फैरल आणि ऐश्वर्या ही खूप विचित्र जोडी आहे. अशा प्रकारच्या कमेंट्स या फोटेशूटवर देण्यात आल्या आहेत. याआधी ऐश्वर्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात दिसली होती. आती ती आपल्या आगामी चित्रपट 'फन्ने खां'मध्ये व्यस्त आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य