Thursday, 15 November 2018

'बागी 2'ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, पद्मावत, पॅडमॅनलाही टाकले मागे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

टायगर श्रॉफचा अॅक्शन सिनेमा 'बागी 2' ला बंपर ओपनिंग मिळालीय. पहिल्याच दिवशी या सिनेमाने पद्मावत, पॅडमॅन आणि या वर्षात रिलीज झालेल्या इतर सर्व सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे मागे टाकलेत. बागी 2 ने पहिल्याच दिवशी काऊंटर तिकीटावर 12 कोटीची कमाई केली आहे.

बागी 2 मध्ये टायगरसोबत दिशा पाटणी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अॅक्शन, ड्रामा, थ्रिल, लव यासर्वाचं एकंदरीत कॉम्बिनेशन या सिनेमात पाहायला मिळणार आहे. याआधी बागीमध्ये टायगरसोबत श्रद्धा झळकली होती. तर आता दिशाचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य