Friday, 18 January 2019

केरळमधील रेडिओ जॉकी रसिकन राजेश याची स्टुडिओत घुसून हत्या

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, केरळ

केरळमधील लोकप्रिय आरजे (रेडिओ जॉकी) रसिकन राजेश यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

राजेश उर्फ रसिकन राजेश काही दिवसांपूर्वीच दोहामधून भारतामध्ये परतला होता. राजेश आणि त्याचा मित्र कुट्टन हे दोघे एक कार्यक्रम संपल्यानंतर मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास राजेशच्या मेट्रो स्टुडिओमध्ये बसले होते. लाल रंगाच्या मारूती स्वीफ्ट कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी स्टुडिओत घुसून धारदार शस्त्रांनी राजेश आणि त्याचा मित्र कट्टन यांच्यावर हल्ला चढवला. दोघेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना राजेशचा मृत्यू झाला.

राजेश मिमिक्री आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध होता. 'रेडएफएम'मध्ये आरजे म्हणून त्याने अनेक वर्ष काम केलं. याआधी दोहामधील 'व्हॉईस ऑफ केरळ' च्या एफएम स्टेशनसाठी काम करायचा. काही दिवसांपूर्वी राजेश भारतात परतला होता. भारतात आल्यानंतर त्याने मिमिक्री सुरू केली होती. दरम्यान, पोलीस या घटनेचा आणि हल्लेखोरांचा तपास करीत आहे.

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Jan 18 15:50:13 +0000 2019

#Poll- मणिकर्णिका सिनेमावरून करणी सेनेने हिंदू धर्माच्या अपमानाचा मुद्दा करत कंगना राणावतला अॅसिड हल्ल्याची धमकी दि… https://t.co/zuzn0JtGXO
Jai Maharashtra News
Fri Jan 18 15:44:29 +0000 2019

करणी सेनेचं आव्हान... 'मणिकर्णिके'चं प्रतिआव्हान! कंगना राणावतला अॅसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्या करणी सेनेला कंगनाचं… https://t.co/rjRWAvP8aA