Saturday, 17 November 2018

टिव्ही अभिनेता करण परांजपे याचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

छोट्या पडद्यावरचा अभिनेता करण परांजपे याचं मुंबईमध्ये निधन झालं. वयाच्या अवघ्या 26 वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे. करणच्या अकाली मृत्यूने त्याच्या परिवाराला आणि त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.

‘दिल मिल गये’ या मालिकेमधून करण ‘जिग्नेशच्या’ भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला होता. करण त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला. करणच्या मृत्यू मागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी, झोपेतचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

करण परांजपेने ‘दिल मिल गए’ शिवाय ‘संजीवनी’ मालिकेत त्याने महत्त्वाची भूमिका निभावली होती. अनेक मालिकांमध्ये क्रिएटिव्ह हेड म्हणून करणंन काम सांभाळलं होतं. करणचा सहकलाकार करण वाहीने सोशल मिडियावर करणच्या निधनाची बातमी शेअर करुन श्रद्धांजली वाहिली.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य