Thursday, 17 January 2019

अभिनेत्री पूजा डडवालला, सलमानची मदत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवूडचा भाईजान अर्थातचं सलमान खान अडचणीत असलेल्या अनेकजणांना मदत करत असतो. सलमान अभिनेत्री पूजा डडवालच्या मदतीला देखील धावून आला आहे.

‘वीरगती’ या सिनेमातील सलमानची सहकलाकार पूजा डडवाल सध्या टीबी आजाराशी झुंज देत आहे. काही दिवसांपूर्वी पूजाने एका व्हिडिओच्या माध्यमातून सलमानकडे आर्थिक मदतीसाठी याचना केली होती. सलमानने आता पूजाला मदतीचा हात दिला आहे. सलमानची ‘बिईंग ह्यूमन’ ही संस्था पूजाचा उपचाराचा सर्व खर्च करणार आहे.

पूजा डडवाल सध्या टीबी आणि फुफ्फुसाच्या आजाराशी लढत आहे. गेली काही वर्ष पूजा गोव्यात कॅसिनो मॅनेजमेंट करत होती. मात्र आपल्याकडे एकही पैसा नसल्याचा दावा तिने केला आहे. चहा पिण्यासाठीही इतरांवर अवलंबून राहावं लागत असल्याचं पूजा सांगते. पूजाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून तिच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नाहीत. गेल्या 15 दिवसांपासून ती मुंबईतील शिवडीमधल्या रुग्णालयात  उपचारांसाठी  दाखल आहे.

सहा महिन्यांपूर्वी पूजाला टीबीचं निदान झालं. आजारपणात पूजाकडे तिच्या कुटुंबियांनीही पाठ फिरवली आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आर्थिक मदतीसाठी पूजाने आपला व्हिडिओ तयार केला होता. तो पाहून सलमान संपर्क करेल, याची खात्री तिला होती. सिंदूर की सौगंध, हिंदुस्तान, इंतकाम यासारख्या सिनेमात पूजाने अभिनय केला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Jan 17 04:12:31 +0000 2019

आज दिनांक 17-01-2019 पाहा आपलं आजचं भविष्य... https://t.co/Lh5UNv3MdW #Zodiac #Bhavishya #Astrology https://t.co/nMlx67n366
Jai Maharashtra News
Wed Jan 16 17:04:44 +0000 2019

छत्रपती संभाजी महाराजांच्या 339 व्या राज्याभिषेक सोहळ्याला राजकीय नेत्यांची उपस्थिती... https://t.co/sFwVHLHOAw… https://t.co/exTvAAwjTW